Wednesday, November 6, 2013

FeedaMail: गर्जा महाराष्ट्र

feedamail.com गर्जा महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या इतिहासातील उत्कर्षबिंदू

शिवाजी महाराजांनंतर आलेल्या पेशव्यांच्या काळात मराठ्यांचा झेंडा अटकेपार पोचला. यात मराठ्यांचा लढवय्या सेनानी महादजी शिंदे याचा मोठा वाटा होता. दिल्लीच्या तख्तावर ताबा मिळविण्याची दूरदृष्टी ठेवून मोर्चे आखणारा तो धुरीणच म्हणायला हवा. त्यामुळे मराठ्यांचा इतिहास अजरामर झाला. हिंदुस्थानच्या कारभाराचे मुखत्यारपत्र सवाई माधवराव पेशव्यास सुपूर्त करण्याचे काम सहजासहजी होत नसल्याचे लक्षात आल्यावर महादजीने जातीने पुण्यास प्रस्थान ठेवले. मधल्या काळात बरेच पाणी वाहून गेले होते. इतकेच नव्हे, तर या पाण्यात महादजीचे उत्तरेमधील बरेचसे शत्रूही वाहून गेले होते. तरीसुद्धा नर्मदा ओलांडताना महादजीने उत्तरेतील कारभाराची योग्य ती व्यवस्था लावलीच होती. महादजीच्या सैन्यात जवळपास दोनेकशे युरोपियन अधिकारी होते. नव्या कवायती पलटणी तत्पर करण्यासाठी त्याने डी बॉयन उर्फ डभई फिरंग्यास मुक्तहस्ताने पैसे पुरवले होते. इतकेच नव्हे, तर कवायती फौजेस आवश्‍यक तेवढा दारूगोळा व तोफा मिळाव्यात म्हणून आग्य्राजवळ मोठा कारखानाही काढला होता.   महादजी व त्याचे मराठी सहकारी वारंवार डी.

Read More »

हिशेब चुकता केला

दिल्लीवर नियंत्रण ठेवण्याच्या मराठ्यांच्या मनसुब्यातील सर्वांत मोठा अडथळा म्हणजे नजीबचे खानदान. हे वैर मराठ्यांना तीन पिढ्या पुरले आणि तिन्ही पिढ्यांचा साक्षीदार होता स्वत: महादजी. पानिपतनंतर नजीबचा मुलगा व नातू यांचा पुरता नक्षा उतरविण्यात महादजी यशस्वी झाला. अठराव्या शतकातील मोगलांच्या सत्तेचा सार्वभौम बादशहा शहा आलम याची अवस्था बुद्धिबळातल्या राजासारखी झाली होती व ती करणाऱ्या दोन सत्ता म्हणजे ब्रिटिश आणि मराठे. व्यक्तींच्या भाषेत बोलायचे म्हणजे वॉरन हेस्टिंग्ज आणि महादजी शिंदे. महादजीने बादशहास ब्रिटिशांकडून सोडवले खरे पण ब्रिटिशांनीही धूर्तपणे शहाजादा जवॉंबख्त याला आपल्या ताब्यात ठेवून काटशह द्यायचा प्रयत्न केलाच. दिल्लीवर नियंत्रण ठेवण्याच्या मराठ्यांच्या मनसुब्यातील सर्वांत मोठा अडथळा म्हणजे नजीबचे खानदान. हे वैर मराठ्यांना तीन पिढ्या पुरले, आणि तिन्ही पिढ्यांचा साक्षीदार होता स्वत: महादजी. अर्थात पानिपतच्या वेळी महादजी तसा लहानच म्हणावा लागतो.

Read More »

इंग्रज-मराठा युद्ध

पानिपतच्या लढाईनंतर झालेल्या खच्चीकरणाचा फायदा उठवत इंग्रज अधिकाऱ्यांनी दिल्लीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. वेळप्रसंगी त्यासाठी मोगलांशी हातमिळवणीही केली मात्र महादजी शिंदेंसारखा लढाऊ सेनानी असणाऱ्या मराठ्यांनी इंग्रजांचे हे प्रयत्न वेळोवेळी हाणून पाडले. पानिपतच्या लढाईत हार खाऊनसुद्धा मराठ्यांचे उत्तर हिंदुस्थानातील स्थान अबाधितच राहिले, या वस्तुस्थितीतच मराठ्यांचे मोठेपण सामावले आहे. मात्र या पराभवामुळे झालेल्या खच्चीकरणाचा परिणाम म्हणून मराठ्यांना पूर्व हिंदुस्थानात व विशेषतः बंगालकडे आपला जम बसवता आला नाही तो नाहीच. त्याचा फायदा क्‍लाइव्ह व हेस्टिंग्ज अशा धूर्त इंग्रज अधिकाऱ्यांनी बरोबर उठवला. ज्याच्या ताब्यात दिल्ली त्याच्या हातात हिंदुस्थानच्या सत्तेची किल्ली, हे सूत्र मराठे आणि इंग्रज या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांनी बरोबर ओळखले होते व त्याला धरूनच ते राजकारण करीत होते. अर्थात इंग्रज परकीय असल्यामुळे त्यांचा या बाबतीतील दृष्टिकोन केवळ नफानुकसानीच्या हिशेबाचा होता. त्याचा फायदा त्यांना मिळाला.

Read More »

तत्त्वासाठी लढणारे मराठे

मराठे हिंदुस्थानचे राज्यकर्ते म्हणून वागत होते. केवळ लुटारू म्हणून दुसऱ्या लुटारूशी ते लढले नाहीत. हिंदुस्थानात सत्ताधीश कोणी व्हायचे किंवा राहावयाचे याबद्दल वाद असो, पण राज्य हिंदी रहिवाशांचेच असले पाहिजे व तेच राज्यकर्ते राहिले पाहिजेत, या तत्त्वासाठी मराठे पानिपतात लढले. मराठ्यांनी उत्तरेकडील राजकारण हाती घेतल्यामुळे अफगाणिस्तान-इराणकडून येणाऱ्या धार्मिक, मूलतत्त्ववादी सत्तांच्या संकटातून हिंदुस्थानचा बचाव झाला. या संकटाबरोबरच दुसऱ्याही एका परकीय सत्तेचे सावट तेव्हा या देशावर पडत होते. कलकत्ता येथील इंग्रज दिवसेंदिवस प्रबळ होत होते. आपल्या फ्रेंचादी पाश्‍चात्त्य प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकून त्यांनी हिंदुस्थानातील आपला पाया बळकट केला होता. बंगालमधील सिराजउद्दौला या मोगल सुभेदाराचा प्लासीच्या लढाईत पराभव करून इंग्रजांनी दिल्लीच्या मोगल बादशहाकडून बंगालची दिवाणी प्राप्त केली होती. या मोबदल्यात त्यांनीही दिल्लीच्या बादशहाच्या रक्षणाची हमी घेतली होती.

Read More »

अटकेवर झेंडे फडकले तेव्हा...

अटकेपार झेंडे लावणे, ही मराठ्यांच्या इतिहासातील एक रोमांचकारी घटना आहे. या घटनेला दुसऱ्याही दृष्टीने महत्त्व आहे. धर्मशास्त्राने निर्माण केलेल्या काही चमत्कारिक रूढींपैकी "अटक' ओलांडायची नाही, ही एक रुढी होती. मराठ्यांनी अधिकृतपणे ती झुगारून लावली. इ.स. 1761 यावर्षी पानिपतच्या युद्धाची द्विशताब्दी होती. त्यानिमित्ताने प्रसिद्ध इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकर यांनी पानिपतच्या युद्धावर स्वतंत्र शोधग्रंथ लिहिण्याचा संकल्प सोडला. आता असा ग्रंथ लिहिणे म्हणजे प्रत्यक्ष पानिपतच्या युद्धभूमीवर जाऊन तिचे निरीक्षण करणे क्रमप्राप्तच होते. ते त्यांनी केलेच परंतु त्याच्याही आधी वीस वर्षे, शेजवलकर मराठ्यांच्या इतिहासातील अटक नावाच्या ठिकाणी असलेला किल्ला पाहण्यासाठी गेले होते. येथील अहमदशहा अबदालीच्या तळावर हल्ला करून त्याला पिटाळून लावल्यामुळे पानिपत जणू अपरिहार्य झाले होते. या प्रदेशाचे वर्णन करताना शेजवलकर काहीसे भावुक झाले ः ""सिंधू नदी या भागात अटकेपासून दक्षिणेकडे व नैऋत्येकडे शुद्ध खडकातून बहू युगांच्या वाहण्याने मार्ग खोदून एकाकी काळाबादपर्यंत बिनवाळवंटी पाणातून शंभर मैल वाहत जाते.

Read More »

हिंदुस्थानचा बंदोबस्त

मराठ्यांचा दरारा व दबदबा हिंदुस्थानातच नव्हे, तर हिंदुस्थानाबाहेरही पसरत होता. त्यांना दूर ठेवून हिंदुस्थानात कोणालाही कोणतेही राजकारण करता आले नसते. हिंदुस्थानचा बंदोबस्त हा या काळातील मराठ्यांच्या राजकीय धोरणाचाच भाग होता. मराठ्यांमधील पराक्रमादी गुणांना जमेस धरूनसुद्धा केवळ अशा गुण समुच्चयामुळे नवे राज्य उभे राहील व टिकेल याची खात्री देता येत नाही. या गुणांचा उपयोग कोणत्या दृष्टीने केला जातो या मुद्यालाही महत्त्व आहे. मराठी राजांपासून तर प्रजेपर्यंतचे लोक महाराष्ट्र राज्याकडे ईश्‍वरी अधिष्ठान असलेले राज्य म्हणून पाहात होते, याची चर्चा करण्यात आलेली आहेच. ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यातील कलहामुळे एका गादीच्या दोन गाद्या झाल्या. कोल्हापूर येथे राजारामपुत्र संभाजी स्वतंत्रपणे राज्य करू लागला मात्र या वाटणीनंतरही स्पर्धा व कलह सुरू राहिला. निजामासारख्या शत्रूला मराठी राज्यातील हा गृहकलह हवाच होता. त्याने त्यास सर्वतोपरी प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. शाहू महाराजांनी संभाजीराजांना कशा प्रकारे समजावले याची नोंद महत्त्वाची आहे.

Read More »

"तुका म्हणे चाली झाली चहु देशी'

औरंगजेब बादशहाच्या धर्मांध आणि हटवादी धोरणाला शह देण्यासाठी मराठे हिंदुस्थानभर पसरले तेव्हा बादशहाचे आक्रमण ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक इष्टापत्तीच ठरल्यासारखे झाले. मराठ्यांच्या अंगभूत गुणांना व्यक्त होण्याची संधी खरे तर औरंगजेबानेच प्राप्त करून दिली होती. औरंगजेब बादशहाने आपल्या आयुष्याची जितकी वर्षे मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी वाया घालविली, जवळपास तितकीच वर्षे मराठ्यांकडे दिल्लीचा ताबा असावा व त्यापेक्षा अधिक काळ मराठ्यांचीच दिल्लीच्या तख्ताचे रक्षण करावे, यात नियतीचा न्याय जो काय असेल तो असो पण ही मराठ्यांनी केलेली सव्याज वसुली होती असेही म्हणता येईल. आपले राज्य हे इतरांपेक्षा वेगळे असल्याची महाराष्ट्रातील लोकांची भावना असल्याचा उल्लेख यापूर्वी झालेला आहे. त्याला ते "प्रासादिक' मानायचे. भगवंत रामचंद्रपंत अमात्य यांना द्वारकोजी यादवाने लिहिलेल्या पत्रातून या संदर्भात "वरदी' असाही शब्द आलेला आहे. "वरदी' म्हणजे ईश्‍वराच्या वरप्रसादे प्राप्त झालेले. साहजिकच अशा राज्याच्या रक्षणाची जबाबदारी आपल्याकडे असण्याचीही मराठ्यांची भूमिका होती, हे वेगळे सांगायला नको.

Read More »

मराठ्यांचा गनिमी कावा

गनिमी कावा ही मराठ्यांची परंपरागत युद्धपद्धती मानली जाते. शत्रूचे सामर्थ्य आपल्यापेक्षा जास्त असेल आणि म्हणून त्याला समोरासमोर टक्कर देणे परवडण्यासारखे नसेल, तर मराठे या तंत्राचा उपयोग करीत. प्रसंगानुरूप यशस्वी माघार हाही सद्‌गुण ठरतो, हे मराठ्यांनी गनिमी युद्धातून दाखवून दिले. डॉ. सदानंद मोरे औ रंगजेब बादशहाला जवळपास पाव शतक मराठ्यांनी झुंजविले. महाराष्ट्रातील मराठ्यांचे स्वराज्य नष्ट करण्याचा त्याचा मनसुबा जागच्या जागीच राहिला. इतकेच नव्हे, तर तो स्वतःच महाराष्ट्राच्या मातीत मिळून गेला. राजधानी सोडून इतका दीर्घकाळ अन्य कोणी सत्ताधारी मोहिमेवर राहिला नव्हता. हा एक आगळा वेगळा विक्रम त्याच्या नावावर चढला. त्याचबरोबर एवढ्या बलाढ्य बादशहाला आव्हान देणारे म्हणून मराठ्यांचा दबदबा व दराराही हिंदुस्थानभर प्रस्थापित झाला. संयुक्त संस्थांनांची सत्ता संपूर्ण अमेरिका खंडात पसरणार या 19 व्या शतकातील समर्थनीय श्रद्धेचा उल्लेख अमेरिकन इतिहासकार manifest destiny असा करतात. तशीच समजूत मराठ्यांच्या बाबतीत आता भारतभर पसरू लागणे स्वाभाविक होते.

Read More »

महाराष्ट्र राज्याचे वेगळेपण

शि वछत्रपतींच्या मृत्यूनंतर त्यांनी स्थापन केलेले महाराष्ट्राचे "स्वराज्य' नष्ट करण्याच्या इराद्यानेच सर्वसामर्थ्यसंपन्न मोगल बादशहा औरंगजेब विंध्य पर्वत ओलांडून जातीने दक्षिणेत उतरला. यापूर्वी कोणताही मोगल बादशहा तख्तावर असताना दक्षिणेत स्वत: आला नव्हता, हे लक्षात घ्यायला हवे. तो दिल्लीला परत गेला नाही, हा आणखी विशेष मुद्दा. त्याची मराठ्यांवरील मोहीम ही अशा प्रकारे आत्मघातकी ठरली व तिने मोगल साम्राज्याच्या विघटनाचा पायाच घातला. शिवाजी महाराजांची कोंडी करून औरंगजेबाने त्यांना उत्तरेत यायला भाग पाडले व त्यांचा तेथेच शेवट करण्याची योजना आखली. त्याची ही योजना पूर्णपणे फसली व महाराज शिताफीने निसटून स्वगृही परतू शकले. इकडे स्वत: होऊन दक्षिणेत आलेला औरंगजेब मात्र तेथे जो अडकून बसला, तो परत जाऊच शकला नाही. इतकेच नव्हे, तर त्याच्या मृत्यूनंतर मराठेच उत्तरेत गेले व त्यांनी शेवटी मोगल साम्राज्याला मुठीत दाबले. शिवाजी महाराज विरुद्ध औरंगजेब यांच्यातील लढ्याचे पर्यवसान शेवटी हे असे मराठ्यांच्या वर्चस्वात झाले.

Read More »

शिवाजी लोकांचा राज्यविस्तार

शिवाजी महाराज व त्यांची धोरणे यांना आदर्श मानून वाटचाल करणाऱ्या "शिवाजीच्या लोकां'ना आपली आणि महाराजांची बरोबरी होत नाही, याचीही पुरती जाणीव होती. धावडशी येथील ब्रह्मेंद्रस्वामी यांनी तुळाजीपुत्र संभाजीला लिहिलेल्या एका पत्रात त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याच्या उद्देशाने "तुम्हीही कोकणचे राजेच आहात' असा उल्लेख केला होता, त्याचा संदर्भ देऊन "तुळाजी आंग्रे ः एक विजयदुर्ग' या पुस्तकाचे लेखक श. श्री. पुराणिक लिहितात, ""पण शिवाजी महाराजांच्या पायरीला पाय लावणे, त्याला स्वतःलाच खपले नाही. त्याने स्वामींना लिहिले ""तरी पूर्वी श्रीमंत महाराज राजश्री थोरले कैलासवासी स्वामीचे वेळेस उभयता महापुरुष होते. त्यांचे कृपादृष्टीने सर्व कल्याण होत होते. हे गोष्टी ते यथार्थच आहे. तथापि महाराज अवतारी होते, वरदी होते. तेणेकरून जेजे इच्छिले परार्थ, ते ते सिद्धीस गेले. महाराष्ट्र नूतनच निर्माण करून स्वधर्म स्थापना केली. त्यांनी साहस कर्मे सामान्य केली ऐसे नाही. त्यांची उपमा त्यासच. अन्यत्रास बोलिली नाही.'' डॉ. पुराणिकांचे मत यथार्थच आहे.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

No comments:

Post a Comment